२९ सप्टेंबर रोजी ST आरक्षणासाठी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा - अमित राठोड
बंजारा समाजाला हैद्राबाद गॅझेटरनुसार अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी न्याय मागणी मोर्चा २९ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आयोजित करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते अमित राठोड व कपिल राठोड यांनी लाखोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.

बंजारा समाजाच्या विराट मोर्चात लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा - कपिल राठोड
नांदेड: राज्य सरकारने हैद्राबाद गॅझेटर तात्काळ लागू करुन मराठा समाजाच्या धर्तीवर ज्या पद्धतीने अध्यादेश काढला त्याच धर्तीवर अध्यादेश काढावा व राज्य सरकार कडून केंद्र सरकार ला शिफारसकरून बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती मध्ये समावेश करावा अशी शिफारस करावी या न्याय मागणीसाठी २९ सप्टेंबर रोज सोमवार रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर आयोजित करण्यात आलेल्या विराट मोर्चात बंजारा समाज बांधवांनो लाखोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते अमित राठोड तथा सामाजिक कार्यकर्ते कपिल राठोड यांनी केले आहे.
या संदर्भात कपिल राठोड यांनी आमच्या प्रतिनीधीशी बोलताना म्हणाले की, हैद्राबाद संस्थान अस्तित्वात असताना मराठवाडा बंजारा समाज हा आदिवासी आणि मागास आहे असा उल्लेख हैद्राबाद गॅझेटर मध्ये आहे तशा दोन लाख नोंदी उपलब्ध झाल्या आहेत. आंध्रप्रदेश आणि आता त्यातुन वेगळा झालेला तेलंगणा राज्यातील बंजारा समाजाला अनुसूचित जमाती च्या सवलती मिळाल्या परंतु मराठवाड्यातील बंजारा जातीच्या लोकांना तक्षछढ या प्रवर्गात समाविष्ट करण्यात आले वास्तविक पाहता देशभरात बंजारा समाजाची एकच बोलीभाषा आहे एकच पेहराव आणि एकच संस्कृती असताना सुद्धा वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे आरक्षण तत्कालीन राज्य सरकारने लागू केले होते.
महाराष्ट्र राज्य सरकारने २ सप्टेंबर २०२५ रोजी मराठा, कुणबी समाजासाठी हैद्राबाद गॅझेटर लागु करून तशा प्रकारचा अध्यादेश काढला आहे त्याच धर्तीवर हैद्राबाद गॅझेटर लागु करून बंजारा जातीचा समावेश एस टी प्रवर्गात समावेश करावा या न्याय मागणीसाठी नांदेड जिल्ह्यासह राज्यातील बंजारा समाज बांधव रस्त्यावर येऊन आंदोलन करीत आहेत. हैद्राबाद गॅझेटर तात्काळ लागू करुन बंजारा समाजाचा एस टी प्रवर्गात समावेश करावा या न्याय मागणीसाठी २९ सप्टेंबर रोज सोमवार रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा समाजाच्या वतीने विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून या ऐतिहासिक मोर्चात लाखोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शेवटी अमित राठोड, कपिल राठोड यांनी केले आहे.