समाजात तेड निर्माण न करता संविधानिक आरक्षण देण्याचा प्रयत्न करणार - खा. अशोकराव चव्हाण
बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार एसटी आरक्षण लागू करण्यासाठी १८ सप्टेंबर रोजी नांदेडमध्ये बंजारा शिष्टमंडळाने खा. अशोकराव चव्हाण यांना निवेदन दिले. आरक्षण कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शहर व जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हे निवेदन सादर केले.

नांदेड : बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट नुसार एसटी आरक्षण लागू करण्याची मागणीचे निवेदन खा. अशोकराव चव्हाण ना बंजारा शिष्टमंडळाने दिले. दिनांक १८ सप्टेंबर रोजी नांदेड शहरातील व जिल्ह्यातून आलेल्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आरक्षण कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी खा. अशोकराव चव्हाण यांना बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेट मध्ये नोंद असल्यानुसार एसटीचे आरक्षण लागू करण्याचे निवेदन देण्यात आले.
निवेदन देत असताना आ. तुषार राठोड डॉ. बी.डी. चव्हाण, देविदासभाऊ राठोड, अॅड. रामराव नाईक, रोहिदास जाधव, जिवन आडे, अँड. विनोद चव्हाण, साहेबराव राठोड, उत्तम चव्हाण, वसंत पवार, रावसाहेब राठोड, स. बाबूसिंग राठोड यांच्या हस्ते देण्यात आले याप्रसंगी नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून कर्मचारी वर्ग, आजी-माजी सरपंच, सामाजिक काम करणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सध्या महाराष्ट्रात आरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात जन आंदोलन होत असताना दिसत आहे महाराष्ट्र हा सर्व जातीय समाजाचे राज्य आहे आणि या महाराष्ट्रातील बंजारा समाज आज सुद्धा मोठ्या प्रमाणात ऊसतोड कामगार व मजूर वर्ग आहे तो आजही डोंगरराळ भागात तांड्यावर राहतो हे मला माहित आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही समाजा सोबत वाद न घालता कोणत्याही समाजात तेड निर्माण न करता संविधानिक आरक्षण देण्याचा प्रयत्न करू असे म्हणाले.