अनुसूचित जमातीच्या मागणीसाठी बंजारा समाजाचा किनवट येथील उपविभागीय कार्यालयावर विराट मोर्चा
बंजारा समाजाने अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी करण्यासाठी हजारो कार्यकर्त्यांसह किनवट शहरात भव्य मोर्चा काढला. १ नोव्हेंबर १९५६ च्या राज्य पुनर्घटन अधिनियमानुसार मुळतः हैदराबाद स्टेटमधील आदिलाबाद जिल्ह्यातील किनवट व माहूर तालुक्यांसाठी एसटी आरक्षण तात्काळ लागू करण्याचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपविभागीय अधिकारी किनवट मार्फत दिले.

किनवट: बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करावे या मुख्य मागणी साठी नांदेड जिल्हयातून बंजारा समाज हजारो च्या संख्येने किनवट शहरात जमला होता. मुख्य रस्त्याने भव्य मोर्चा काढून मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उप विभागीय अधिकारी किनवट यांच्या मार्फत देण्यात आले.
बंजारा समाजाने किनवट शहरातून भव्य असा मोर्चा काढून मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना उप विभागिय अधिकारी किनवट यांच्या मार्फत निवेदन दिले त्या निवेदनात १ नोव्हेंबर १९५६ रोजीच्या राज्य पुनर्घटन अधिनियम १९५६ अंतर्गत किनवट तालुका | नांदेड जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आला हा तालुका मूळचा हैदराबाद स्टेट मधील आदिलाबाद जिल्ह्याचा भाग होता. भौगोलिक दृष्ट्या किनवटच्या आदीलाबाद अंतर केवळ ५० किलोमीटर असून नांदेड जिल्ह्याचे अंतर समोर १५० किलोमीटर आहे.
यावरून असे स्पष्ट होते की हा समावेश स्थानिक जनतेच्या सोयीसाठी नेहमी तर प्रशासकीय कारणास्तव करण्यात आला. थोटी समाजाला अनुसूचित जमातीतील प्रवर्गातील आरक्षण आदिलाबाद व राजुरा या दोन्ही ठिकाणी कायम ठेवण्यात आले. भैसा मुधोळ हे तालुके पूर्वी नांदेड जिल्ह्यात होते राज्य पुनर्रचनेचे कायदे अंतर्गत हैदराबाद स्टेट मध्ये विधीन करण्यात आले तेथील बंजारा समाजाचा १९७६ च्या राज्य आयोगानुसार अनुसूचित जमाती प्रवर्गातील आरक्षण कायम ठेवण्यात आले.
म्हणूनच आम्हाला सध्या असलेल्या आदिवासी बांधवांच्या ७ टक्के आरक्षणात हिसा नको आहे . आम्हाला पूर्वी मिळणारे डी नोटिफाईड ट्राईब म्हणून स्वतंत्र साडेपाच टक्के आरक्षण संविधानाच्या अनुच्छेद १६ प्रमाणे बहाल करून अनुसूचित जमाती या प्रवर्गात समाविष्ट करण्यात यावे न्यायमूर्ती बापट आयोग २००४ ची शिफारस लागू करावी १९५६ च्या राज्य पुनर्रचना कायद्यानुसार मुळात एसटी प्रवर्गात असलेल्या आमच्या तालुक्याला (उदा आदीलाबाद मराठवाड्यातील निजाम अधिपत्याखालील जिल्हे तालुके ) तात्काळ शासन निर्णयाद्वारे प्रमाणपत्र व सवलती द्याव्यात.
वरील सर्व बाबींचा विचार करून आमचा किनवट व माहूर तालुक्यातील बंजारा समाज जमातीला अनुसूचित जमातीचे आरक्षण तात्काळ लागू करावे. अशा मागणीचे निवेदन मुख्य मंत्री फडणीस यांना उपविभागीय अधिकारी किनवट मार्फत देण्यात आले. पोलिस निरीक्षक देविदास चोपडे यांनी चोक पोलिस बंदोबस्त ठेवला होता.