सरकारने जागृत झालेल्या तांडा शक्तीकडे दुर्लक्ष करू नये

बंजारा समाजाने हैदराबाद गॅझेटनुसार अनुसूचित जमाती आरक्षण मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरून तीन विराट मोर्चे काढले. जालना व बीड जिल्ह्यातील एकाच दिवशी झालेल्या मोर्चांमध्ये समाजाची मोठी गर्दी दिसून आली आणि ही चेतना समाजाला अधिक सशक्त बनवणारी ठरली.

सरकारने जागृत झालेल्या तांडा शक्तीकडे दुर्लक्ष करू नये

हैदराबाद गैजेटीयरनुसार आम्हालाही अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे म्हणून तांड्यातील बंजारा समाज कधी नव्हे तो आपल्या अस्तित्वाच्या लढाईसाठी ज्या ताकदीने रस्त्यावर उतरलेला आहे. त्याचे वर्णन शब्दातीत आहे. या आठवड्यात जे तीन विराट मोर्चे निघाले त्याचे स्वरुप पाहता आता तो माघार घेणार नाही याचे हे संकेत आहेत. हे तिन्ही मोर्चे बंजारा समाजाची चेतना जागवणारे होते. जालना आणि बीड हे दोन जिल्हे अतिशय जवळ असूनही एकाच दिवशी निघालेल्या मोर्चात समाजाने केलेली गर्दी प्रचंड होती. 

जालना आणि बीड पाठोपाठ तीनच दिवसांनी निघालेल्या किनवट येथील मोर्चाला झालेली गर्दी खऱ्या अर्थाने रेकॉर्ड ब्रेक होती. आणि यापुढील प्रत्येक मोर्चात होणारी गर्दी ही रेकॉर्ड ब्रेकच असणार आहे यात शंकेचे कारण नाही. मोर्चात सहभागी होणारा सर्वसामान्य बंजारा समाज स्वतः होऊन स्वयंस्फूर्तपणे पुढील पिढीच्या भवितव्यासाठी मोर्चात सहभागी होत आहे. त्याला कोणत्याही समितीशी नेत्यांशी कांहीही देणे घेणे नाही. स्वतःच्या अस्तित्वाची लढाई तो स्वतःच लढत आहे. आज समाज कोणत्याही समितीच्या सांगण्यावरुन मोर्चाला येत नाही. हे येथे विशेष नमुद करण्यासारखे आहे. समाज आज कोणत्याही समितीवर अवलंबूनही नाही. तो स्वयंभू आहे. त्यामुळेच राज्यभरात आजवर विविध ठिकाणी निघालेले मोर्चे प्रचंड गर्दीचे होते.

सरकारने चर्चेचे दार खुले करावे

सुप्त अवस्थेत असलेली तांडा शक्ती पूर्णतः जागृत झालेली आहे. त्याचे कारण आरक्षण तर आहेच आहे. याशिवाय वेगळी खदखदही आहे. ही खदखद म्हणजे प्रत्येक सरकारकडून पावला पावलात समाजाची झालेली उपेक्षा.
या उपेक्षेमुळेच बंजारा समाज आपल्या असली स्वरुपाची सध्या फक्त झलक दाखवीत आहे. सामाजिक कार्याकर्ता घेऊन इतर कोणत्याही झलक दाखवित आहे. जेंव्हा तो पूर्ण आपली ताकद दाखवेल तेंव्हा ती त्सुनामी असेल. सततची उपेक्षा, सततचा अन्याय यामुळेच हा वणवा ज्या गतीने पेटत चाललेला आहे जर तो पूर्ण पेटला तर तो सहज विझणार नाही. आणि तो जर पूर्णतः पेटला तर सरकारलासुद्धा ते परवडणारे नसेल.

बंजारा समाजाचे ज्या संख्येने प्रत्येक ठिकाणी मोर्चे निघत आहेत, ती गर्दी पाहून जर सरकारने बंजारा समाजाच्या मागणीचा विचारच केला नाही तर आज एकवटलेली संपूर्ण तांडा शक्ती मुंबईला धडकली तर सरकारला खुप अवघड जाईल. आणि म्हणून सरकारने जागृत झालेल्या तांडा शक्तीकडे दुर्लक्ष न करता, या जागृत झालेल्या शक्तीला रौद्ररुप धारण करायला भाग न | पाडता अतिशय स्वच्छ मनाने, खुल्या दिलाने सरकारने चर्चे चे दार ताबडतोब उघडावे आणि बंजारा समाजाबरोबर 'चर्चा करावी.

त्यांच्या वर्षानुवर्ष दबलेल्या भावना समजून घेऊन इतर कोणत्याही जमातीच्या ताटातले वाटेकरी न बनवता संवैधानिक मार्गाने उचित न्याय द्यावा.  केंद्र व राज्यातील सरकार निश्चितपणे  बंजारा समाजाला न्याय देईल अशी  अपेक्षा आहे.

 प्रा. फुलसिंग जाधव (सामाजिक कार्यकर्ता)