मानोरा शहरात बंजारा समाजाचा विशाल मोर्चा
मानोरा येथे हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एसटी आरक्षण द्यावे, या मागणीसाठी बंजारा समाजाचा भव्य मोर्चा निघाला. पारंपरिक वेशभूषेत महिला-तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग होता.

पांढरे वादळ तहसील कचेरीवर धडकले ! एकच लाल, जय सेवालाल; एक गोर, ओम सवा लाखेर जोर बंजारा समाजाचे मानोरा येथे शक्तिप्रदर्शन
मानोरा दि १८: हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाज अनुसूचित जमाती प्रवर्गात असून, महाराष्ट्रातील बंजारा बांधवांना एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी बुधवारी मानोरा शहरात बंजारा समाजाने विशाल मोर्चा काढत मोठे शक्तिप्रदर्शन केले. नियोजनाप्रमाणे सकाळी १२ वा वाजेपासून बंजारा समाजबांधव मोर्चासाठी पंचायत समिती जवळ एकत्र येत होते. मोर्चेकऱ्यांच्या हातात संत सेवालाल महाराज, रामराव महाराज, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर, काशिनाथ नायक यांचे त्रि व पांढरे झेंडे, तसेच प्रमुख मागणीचे फलक होते. मोर्चात पारंपरिक वेशभूषेत महिला भगिनी सहभागी होत्या, तर बहुतांश तरुण गळ्यात पारंपरिक कवल पट्टा घालून लक्ष वेधत होते.
एकच लाल, जय सेवालाल, एकच गोर, ओम सवा लाखेरो जोर अशा घोषणा आंदोलकांनी दिल्याने मानोरा शहर दणाणून गेले. दरम्यान, मोर्चा झाल्यापासूनच पारपंरिक वेशभूषा परिधान करुन आलेल्या महिलांनी लक्ष वेधले होते.
संजय महाराज यानी आता बंजारा समाज पेटून उठला आहे. शासनाने तात्काळ समाजाला एस टी प्रवर्गात समावेश करावे. ही सुरवात झाली आहे आमचा अंत पाहु नये. असे सागितलले. यावेळी श्याम राठोड, वसंत राठोड, प्रा. नामा बंजारा आदिनी आपले विचार व्यासपीठ समोर ठेवले यावेळी महिला, युवती, युवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोर्चा वेळी ठाणेदार नैना पोहेकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. आंदोलकाची शिस्त, मोर्चा मार्गावर काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मोर्चासाठी विविध दिशेने मानोरा मध्ये दाखल होणाऱ्या जिल्ह्यातील वाहनांची पार्किंग सुविधा करण्यात आले होते. आंदोलकांनी शिस्तीचे दर्शन घडविले, उपविभागीय अधिकारी