बंजारा समाजाला न्याय देण्यासाठी संत प्रेमसिंग महाराज मैदानात

नांदेड जिल्ह्यातील बंजारा समाजाच्या आरक्षण कृती समितीची बैठक १४ सप्टेंबर रोजी संदिपाणी पब्लिक स्कूल, तरोडा येथे संपन्न झाली. बैठकीत समाजाचे आरक्षण, सामाजिक न्याय आणि विकास याबाबत चर्चा झाली. प्रकाश राठोड यांनी बंजारा समाजाच्या दुर्दशेवर प्रकाश टाकत, समाज जागृत होण्याची गरज असल्याचे मत मांडले.

बंजारा समाजाला न्याय देण्यासाठी संत प्रेमसिंग महाराज मैदानात

नांदेड आरक्षण कृती समितीची बैठक संपन्न

हैदराबाद गॅझेट मध्ये नोंद असलेल्या बंजारा समाजाला एस टी प्रवर्गात समाविष्ट करा या मागणीच्या अनुषंगाने नांदेड आरक्षण कृती समितीची बैठक संपन्न. दि. १४ सप्टेंबर रोजी संदिपाणी पब्लिक स्कूल तरोडा (बु.) नांदेड येथे नांदेड जिल्ह्यातील सकल बंजारा समाजातर्फे आरक्षण कृती समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचे प्रमुख मार्गदर्शक दीक्षा गुरु श्री संत प्रेमसिंग महाराज कोतापल्ली तर बैठकीचे अध्यक्ष डॉ. बि. डि. चव्हाण हे होते. या बैठकीत प्रस्तावना पर भाषण बोलताना प्रकाश राठोड मनाले बंजारा समाज आजही डोंगर खोऱ्यात तांड्यात वास्तव करून राहत आहे व अनेक बंजारा बांधव शेती व कोणते काम भेटत नसल्याने मोठ्या प्रमाणात ऊस तोड कामगार म्हणून जीवन जगत आहे तरीही सरकार या समाजाच्या विकासाची दखल घेत नाही आता समाजाला जागृत होणे गरजेचे आहे असे मत मांडले.

तर बैठकीस नांदेड जिल्हा भरातून आलेले राजकीय व सामाजिक कार्यकर्ते जीवन आडे, उत्तम चव्हाण, बालाजी राठोड, भगवान राठोड, प्रा. डि. आर. पवार, रोहिदास जाधव आड.पी.एम. चव्हाण, माधव राठोड, एडवोकेट दिलीप राठोड, वकील राठोड, रामधन राठोड, अतुल राठोड, सुशील कुमार चव्हाण, साहेबराव चव्हाण, रमेश राठोड, प्रफुल राठोड, इंजि. रोहन राठोड रामराव राठोड महाराज (भाटेगावकर), सौ. श्रद्धा चव्हाण, डॉ. निकिता चव्हाण यांनी उपस्थित सर्व समाज बांधवास मार्गदर्शन करून आपले मत मांडले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बि. डी. जाधव सर यांनी केले तर आभार सुरेश गोपीनाथ राठोड यांनी केले.

विराट महामोर्चात लाखोच्या संख्येने उपस्थित रहा - डॉ. बि. डि. चव्हाण

महाराष्ट्र सरकारने २ सप्टेंबर रोजी मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट करण्यासाठी कुणबी आरक्षण देण्यासाठी हैदराबाद गॅजेट ईबर चा संदर्भ देऊन शासन निर्णय जाहीर केला आहे. या धर्तीवर बंजारा समाजाला हाच गॅजेट लागू करून शासन निर्णय जाहीर करावा व बंजारा समाजाला अनुसूचित जमातीच्या प्रवर्गात समाविष्ट करावा. हैदराबाद संस्थांमधील नोंदी पाहून बंजारा समाज हा अनुसूचित जमातीच्या प्रवर्गात मोडतो याच आधारे आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यात बंजारा समाज अनुसूचित जमातीच्या प्रवर्गात आरक्षणाचा फायदा घेतोय. या संविधानिक मागणीसाठी २९ सप्टेंबर रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा समाजाचा विराट मोर्चा आयोजन करण्यात आला आहे, तरी बंजारा बांधवांनी समाजाला आपले हक्क मिळवून देण्यासाठी या विराट महामोर्चात लाखोच्या संख्येने उपस्थित रहावे आसे मत डॉ. वि. डि. चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.

संत रामराव महाराज (बापू) बंजारा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी दिल्ली, मुंबई, नागपूर उपोषणाला बसले पण बंजारा समाजात जागृतीचा अभाव मुळे आपण सरकारसमोर आपला दबाव तयार करू शकलो नाही पण आता परत एकदा ही संधी आली आहे आता बंजारा बांधवांनी एकत्र घेऊन लढात सहभाग घेऊन या मोर्चात लाखोच्या संख्येने सहभाग घ्यावा अशी आवाहन दिक्षा गुरु संत. प्रेमसिंग महाराज यांनी केले.