12 जुलै आरक्षण मेळावा: वाशीम जिल्ह्यातून हजारो गोरबंजारा सहभागी होणार

गोरसीकवाडी गोरसेनेच्या वाशीम बैठकीत 12 जुलै रोजी संभाजीनगर येथे होणाऱ्या एसटी आरक्षण मेळाव्यासाठी वाशीम जिल्ह्यातून किमान 3000 गोरसैनिक व समाजबांधव सहभागी होणार असल्याचा निर्धार व्यक्त.

12 जुलै आरक्षण मेळावा: वाशीम जिल्ह्यातून हजारो गोरबंजारा सहभागी होणार

12 जुलै रोजीच्या आरक्षण मेळाव्यात  वाशीम जिल्ह्यातून हजारो गोरबंजारा  सहभागी होणार- गोरसीकवाडी गोरसेनेच्या वाशीम बैठकीचा निर्धार  

वाशीम जिल्हा प्रतिनिधी -

गोर बंजारा समाजाची आदीम लक्षणे बघता आदीवासी आरक्षणाचे प्रबळ दावेदार असूनही शासनकर्त्यांनी आजपर्यंत फक्त आश्वासनेच दिलीत. फडणवीस सरकारनी सुद्धा न्या.तहलियानी यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण अभ्यास समिती नेमण्यात आली मात्र ही समिती गेल्या सहा महिन्यापासून केवळ कागदापुरतीच सिमित राहिली त्यामुळे हक्काचे आरक्षण मिळविण्यासाठी गोरबंजारा समाजातील गोरसेना गोरसीकवाडी या अव्वल सामाजिक कार्य करणाऱ चळवळीने लढ्याची धुरा खांद्यावर घेऊन गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वात संभाजीनगर येथे होणाऱ्या एस टी आरक्षण मेळाव्यात वाशीम जिल्ह्यातून किमान तिन हजार गोरसैनिक व समाज बांधवभगीनी सहभागी होत असल्याचा अहवाल आजच्या बैठकीतून देण्यात आला. संभाजीनगर येथील  गोरबंजाराचा आरक्षण मेळावा न भुतो न भविष्यती अशाप्रकारे यशस्वी करुनच दाखवू असा ठाम विश्वास कारंजा, मंगरुळपीर, मानोरा, मालेगाव, वाशीम,रिसोड येथून आलेल्या प्रतिनिधीनी व्यक्त केला आहे.

प्रमुख प्रतिनिधी च्या या बैठकीला सजपा चे लोकसभा उमेदवार तथा गोरसीकवाडीचे प्रमुख वक्ते प्रा डॉ अनिल राठोड यांनी संबोधित केले.या बैठकीला सहाही तालुक्यांतील तालुका सर्कल प्रतिनिधी उपस्थित होते. संभाजीनगर येथील आरक्षण मेळाव्याचे प्रचार प्रसार, वाहतूक व्यवस्था, तसेच मुख्य कार्यक्रम बाबत सखोल चर्चा करुन रणनिती आखण्यात आली.

संकलन अनिश नायक वाशीम