नांदगाव तांडा : दारू, सट्टा आणि पत्ता यावर कायमस्वरूपी बंदी; गावकऱ्यांचा ऐतिहासिक निर्णय

नांदगाव तांडा येथील ग्रामस्थांचा निर्धार! गावात दारू, सट्टा आणि पत्ता यावर कायमस्वरूपी बंदी. महिलांचा पुढाकार आणि नियम मोडणाऱ्यांवर सामाजिक बहिष्काराचा इशारा.

नांदगाव तांडा : दारू, सट्टा आणि पत्ता यावर कायमस्वरूपी बंदी; गावकऱ्यांचा ऐतिहासिक निर्णय

नांदगाव तांडा – एक आदर्श, एक प्रेरणा, एक मॉडेल तांडा

सोयगाव तालुका, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नांदगाव तांडा हा आधीपासूनच “आदर्श गाव” म्हणून संपूर्ण पंचकोशीत प्रसिद्ध आहे. सामाजिक ऐक्य, शिस्त आणि विकासाच्या मार्गावर वाटचाल करणारा हा तांडा आज पुन्हा एकदा आपल्या ठाम निर्णयामुळे राज्यभरात आदर्श ठरत आहे.

“दारू, सट्टा आणि पत्ता कायमस्वरूपी बंद” हा निर्णय केवळ घोषणा नसून समाजपरिवर्तनाचा प्रभावी टप्पा आहे. व्यसनमुक्त, सुरक्षित आणि सुसंस्कृत तांडा घडवण्याचा हा ऐतिहासिक निर्धार आहे.

या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी आहेत गावाच्या विद्यमान सरपंच सौ. अरुणा कैलास पवार, ज्यांच्या सक्षम व दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे ग्रामस्थांना एकत्र आणून हा धाडसी निर्णय घेता आला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी घेतलेला पुढाकार हा या चळवळीचा सर्वात मोठा आधार ठरला आहे.

तसेच, या उपक्रमात समाजसेवक श्री. कैलास पवार यांचा सिंहाचा वाटा असून त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे तांड्यात व्यापक जनजागृती झाली आणि हा निर्णय प्रत्यक्षात उतरला.

दारू, सट्टा आणि पत्त्यामुळे होणारे दुष्परिणाम—घरांचा ऱ्हास, कर्जबाजारीपणा, मारामाऱ्या, महिलांवरील अत्याचार आणि मुलांचे बिघडलेले भविष्य—यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून संपूर्ण बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. नियम मोडणाऱ्यांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याची ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

आज नांदगाव तांडा एक खरा “मॉडेल तांडा” म्हणून उभा आहे—
जिथे एकजूट आहे,
महिला सशक्त आहेत,
नेतृत्व ठाम आहे,
आणि समाज व्यसनमुक्तीकडे वाटचाल करत आहे.

सर्व जागृत महिला भगिनींचे मनःपूर्वक अभिनंदन!
आपण असेच समाजजागृतीचे आणि उत्तम समाजकार्याचे कार्य अखंडपणे पुढे नेत राहा, हीच शुभेच्छा.

“महिला आक्रमक… तांडा सुरक्षित!”
“व्यसनमुक्त तांडा… उज्ज्वल भविष्याचा पाया!”

— ✍️ लेखक: श्री. सुकलाल चव्हाण
राष्ट्रीय उपाध्यक्ष, ऑल इंडिया बंजारा सेवा संघ