घोडे को नही घास और गधे खा रहे है... च्यवनप्राश!
गोरमाटीर आजेर वातावरणेप भाष्य करेवाळो एक जबरदस्त लेख.....२०२० सालेम लखोतो ऊ आजही तंतोतंत जुळछं! आपण वाचो.आणि..वाचेर कटाळो आतो हिय तो फारवड तरी करो...!

एक लाख लोक ये लेखेन वाचन सेरानाकेछं....तम कणा वाचियो....भियावो?
काल एका तेरवीच्या निमित्ताने तांड्यात जाण्याचा योग आला .तेरवी मध्ये माझे समाज परीर्वतनाबाबत छोटेखानी भाषण झाले. तेथेच गफलत झाली. काही जाणकार नायक , गोरविचारवंत, हसाबी, नसाबी ,रिटायर अधिकारी , हावशे, गवशे मंडळीनी मला घेरा घातला.आणि तांडयाच्या समस्या काय आहेत? तांडयामध्ये आपल्या सारखी शिकलेली माणसे काय आणत आहे.? या व अशा अनेक प्रश्नावर त्यांच्या सोबत गंभीर संवाद झाला. विषय सुरु होण्याच्या आधीच एका जाणकार नायकाने सांगितले घोडे को नहीं घास और गधे खा रहे है च्यवनप्राश! आम्ही सगळे जोरात हसलो.आणि या गोष्टीचा अर्थ समजावून घेतला. हे जरी कटु असले. तरी दुसरी बाजु मात्र प्रंचड वेदनेची आहे. अशी परीस्थीती अनेक ठिकाणी आपल्याला आढळते. आज गोरमाटी समाजाला कोणाच्याही दांमणीला बांधण्याचा जोरदार प्रयत्न चालू आहे. चला तर या चर्चेचा सुर बघुया......!
महानायक वसंतराव नाईकसाहेब
असतांना एकच संघटना होती.नाईकसाहेबांचा कल हा माझ्या तांडयातील युवक शिकला पाहिजे. म्हणुन बापु फुलसिंग नाईकच्या नावाने पुसद येथे महाविद्यालय सुरू करून आणि ४७० आश्रमशाळा देवून शिक्षण.... शिक्षण आणि शिक्षणावर भर दिला. संघटनेच्या माध्यमातून भारतातील तमाम गोरबंजारा समाजाला एकसंघ करण्याचा प्रयत्न केला..हाल अपेष्टा सहन करणारा गोरबंजारा समाज नाईकसाहेबांमुळे नाईक या स्वाभिमानी पदापंर्यत पोहचला.पण ज्या नाईकसाहेबांनी संघटना काढली. त्या संघटनेचे दोन तिन स्वंय घोषित अध्यक्ष पाहून मन हेलावुन जाते.
आजही गोरबंजारा समाजात जवळपास ८० ते ८५ संघटना कार्यरत आहेत. पण ते गोरसमाजासाठी काय करत आहे .हे न समजण्याच्या पलीकडे आहे. गोरबंजारा समाजावर जेंव्हा जेंव्हा अन्याय, अत्याचार होतो. तेंव्हा मात्र गोरसेना लढतांना दिसते. एवढीच ती जमेची बाजु. रायसिना स्टडीच्या माध्यमातून मुले घडविण्याचे गोरशिकवाडीचे काम अभिनंदनीयचं आहे.या दोन्ही संघटना गोरबंजारा समाजात चांगली जाग्रुती करत आहे. पण समाजातील काही मंडळी यांच्यावरही टिका करतांना दिसते..इतिहासामधून आपण काय शिकलो पाहिजे.? आपली कुठे चुक झाली? ती आपल्याला सुधारता येईल का? आपला इतीहास जरी गौरवशाली ,शुरयोद्धाचा असला तरी आज गोरसमाजाची परीस्थीती एवढी भंयकर का झाली?
याचाही सर्वच घटकातुन विचार होणे काळाची गरज आहे. जर आज तांडयाचा विचार केला तर महसूल दर्जा नाही, आरोग्य, रस्ते,पाणी, ग्रांमपंचायत नाही, दारु,गुटक्याचे वेसन, भावाभावतील वैर, भरसाठ बेरोजगारी असुन लोकांना रोजगार नाही. त्यामुळेच तांडयातील अरधी अधिक माणसे विट कामगार म्हणून पुणे येथे तर काही माणसे बिगारी कामासाठी मुंबई येथे गेलेली असुन .गरीब मुलीचें पर राज्यात विवाह करण्याची गंभीर समस्या सुरु आहे.,इंटरकास्ट मँरेजचे प्रमाण दिवसेंन दिवस वाढत आहे. माझा शेतकरी हा कारखानदार झालाचं पाहिजे अशी घोषणा करणाऱ्या नाईकसाहेबांच्याचं गोरबंजारा समाजातील बहुतांश कुंटुबें ऊस कामगार म्हणून कारखाण्यावर काम करीत आहे.
त्यांच्या मुलाबांळाचे शिक्षण तर सोडा साध पोट भरण्यापुरतीही मजुरी ठेकेदार देत नाही. एवढी भयानक परीस्थीती आहे. एवढेच नाही तरी गरीबीचा फायदा घेत काही दारूडे,रंडीबाज ठेकेदार मजुराच्या बायका, नवतरुण मुलीवर अत्याचार करतात.पण त्यांना या अत्याचारापासुन रोखण्यासाठी ना शासन पुढे येतो? ना समाज, ना संघटना? .म्हणून मनावेसे वाटते घोडे को नहीं घास और गधे खा रहे है च्यवनप्राश.!
बर अशी परीस्थीती गरीब कुंटुबाचीच नाही. तर ज्यांच्या घरात एक नाही. तर दोन दोन लोक नौकरीला आहे. पण ते दारू, बोटी, सळोईत गुंग असल्यामुळे (काही लोक खुबच चांगली आहेत. त्यांना धन्यवाद ) त्यां कुंटुबावर ऊस कापण्याची पाळी आली आहे. हे महाभाग संघटनेत समाज सुधरविण्याच्या गोष्टी करतील. पण आपल्या कुंटुबाकडे अजिबात लक्ष मात्र देणार नाही. थुं.............तुमच्या शिक्षणावर.!.म्हणून आजही तांडयातील बुजरूक मंडळी म्हणतात.
शिकन मनक्या गधा व्हंचं!
शिकुन माणुस गाढव होतो. कदाचित ते खंरेही आहे. नाईकसाहेबांना जावून आज चाळीस वर्ष झाली. तांडयातला शिक्षीत माणुस शहरात आला.बंगले बांधले, गाडी घेतली. पण त्याच्या विचारात मात्र अजीबात फरक पडला नाही. क्रांतीसुर्य सेवालाल बापुचे एक अनमोल वचन आहे.
भजो ...मत!
पुजो...मत!
गोरबंजारा समाजात कर्मकांडाला अजीबात थारा नाही. तरीही हा पी.एन.काँलेजात शिकुन विद्धवान झालेला हा माणूस आपल्या घरात मात्र नित्य नेमाने सत्य नारायण पुजा करणार.,चार पुस्तक शिकलेली त्याची बायको एकादशी,दुवादशी, संकट चंर्तुथी, मार्गशिष,होमहवन,पुजा-अर्चा हमखास करणार.मात्र खारीक,बदाम काजु,मनुका भटजी घेऊन जाणार .म्हणून मनावेसे वाटते घोडे को नहीं घास और गधे खा रहे है च्यवनप्राश! पुजा करणाऱ्याच्या घरी एखादा चुकन पाहुणा आलाचं तर त्याला जेवन सोडा साधा चहाही देणार नाही. रात्र दिवस ..हंरी...ओमचा गजर *दुसरं कायं.अती भक्ती चोरो का लक्षण!* एवढ्यावरच हा महाग्यानी, बुंद्धीवंत थांबनार नाही. तर तो गोरसंस्कृती,गोर धाटी,गोरपरंपरा गौरवशाली असतांना शुद्धा हा गायत्री मंत्र,भगवान आम्मा,बहकुमारी प्रजापिता, महामंत्र,धननिंरकारी, आर्ट आँफ लिव्हींग, या व अशा अनेक पंथ ,धर्माकडे लोकांना घेवून जाण्याचा प्रयत्न करत असतो.
महानायक वसंतराव नाईकसाहेब यांच्या भाषणात कधीही मंदिर, धर्म,कर्मकांड, जात,वंशवाद, यांचा उल्लेख झाला नाही. ऐके ठिकाणी फार सुंदर लिहलेले आहे.नाईकसाहेब यांना पुजा-अर्चा करतांना कधीही बघीतले नाही. पुजा करायचे ते माणसाची आणि माणुसचं हा त्यांचा विकासाचा क्रेंदबिंदु होता तरीही नाईकसाहेबाच्या विचाराला बगल देऊन काही मंडळी मंदीरे बांधण्यात धन्य मानत आहे .तर काही माणसे धर्म लादण्याचा प्रयत्न करीत आहे.(धर्म लादायचाच असेल तर तो अखिल गोरबंजारा समाजाला विश्वासात घेऊन लादावा. त्यांचे स्वागतचं आहे.) घरात गोरबोली बोलणार नाही. पण गोरबोलीला आठव्या अनुसुचीमध्ये टाका म्हणून ओरडणांर,गोरसाहीत्यांची टिंगल टवाळी करणार,आपल्या श्रद्धास्थानावरही चुकीचे लिहणार . मात्र लेखक नेमाडेचा समाचार घेणार नाही. गोरबंजारा समाजाला कमी लेखनारे, बदनामी करणारे अनेक नेमाडे आजही समाजात आहे.
एवढेच नाही. तर अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमाचे निमित्त सांगुन वर्गणी गोळा करणारे अनेक वाझे आज समाजात आहे. गोर हरपणीची सगळी इजत्त आपल्या अभद्र लिखानातुन वेशीवर टांगणाऱ्या लेखक नेमाडेच्या बाबतीत ठोस कोणताही निर्णय आम्ही घेतला नाही. उलट त्याला फोनवर बोलणाऱ्यांचेच कसे चुकले यावर मात्र व्हाँटसपवर भरभरून लिहल्या गेले.काही लोकांनी वेबीनार घेवून लेखक नेमाडेवर कंटाळवाणी आणि चिड आणनारी चर्चा घडुन आणली. पण कोणत्याही संघटनेनी किंवा कोणत्याही राजकीय नेत्यांनी ठोस असा कार्यक्रम न आखल्यामुळे आणि तेवढयात एका मुलीचे आत्महत्या प्रकरण समोर आल्यामुळे आपोआपच लेखक नेमाडे प्रकरण कुठे गेले. याचा थांगपत्ताही लागला नाही. या आत्महत्या प्रकरणावर न बोललेच बंरे राहील. कारण हे प्रकरण प्रंचड गुंतागुंतीचे असुन ते भयंकर क्रिटीक्रेअर आहे.
गोरविचारवंताना विचार करण्यास भाग पाडणारी ही घटना आहे.आपण एकसंघ नसल्यामुळे येथील विषमतावादी व्यवस्था दिवसेंन दिवस. गोरबंजारा समाजाला मागे खेचण्याची संधी शोधत आहे. एवढेच नव्हे तर गोर बंजारा समाजाला एका वेगळ्याच दिशेने नेण्याचा आटोकाट प्रयत्न होत आहे. खंरच आपण गाफील आहोत का? अजुनही आपल्याला गोरबंजारा समाजाच्या सर्वांगीण विकासाकरीता असणारे गोल आपल्याला सापडले नाहीत का? आपण काय करत आहो. हे आपल्यालाच कळलें नाही. हे येथे दुर्दैवाने नमूद करावे लागत आहे. अकल गयी भैस चराने गये कबीरा बोलके! अशी गत आपण सर्वांची झाली आहे का? आज गोरबंजारा समाजात, नाँनक्रिमीलिअर, आरोग्य शिक्षण, पाणी,रोजगार, भरमसाठ हुंडा, ४९८ च्या केसेस,तेरवी या समस्या आवासुन उभया अंसतांना मात्र आपले साहित्यिक, लेखक, कवी, नेते ,मंत्री, आमदार, खासदार विविध संघटनेचे मुखीया,पदाधिकारी, विद्धवान,बुद्धिजीवी, बुद्धिवादी, डॉ. ,वकील, इंजीनिअर , प्राध्यापक, जि.प सदस्य, पं.स.सदस्य मात्र अशा समस्यावर बोलतांना दिसत नाही.ही अंत्यत दुर्दैवी गोष्ट आहे.
आज सगळी कडे आपला धर्म कोणता,आपली धाटी ,पंरपरा,कोणती हेच रडगाणे सुरु आहे. आपला धर्म कोणता .हिंदू की गोर ? यामध्ये गोरबंजारा समाजात आजही एकवाक्यता दिसून येत नाही .माझे काही लेखक मित्र गोरधाटी वर सुंदर लिखाण करतात. मात्र बंजारा समाज ऊस का तोडत आहे. याचा उपाय मात्र त्यांना सापडत नाही. माझा (आयडीयल) भांजा तर तो एवढा गोरधाटीचा भक्त आहे. की आपल्या विनोद लक्ष्मण राठोड या सुंदर नावाचा तो विनीया लछीया भुकीया करून मिरवत आहे. धन्य त्याचा अभ्यास (विनोद रिस मत करेस होळी बोलचंये भांड). नाव बदलण्या पलीकडे त्याच्या जवळ गोरबजारा समाज सुधरविण्यासाठी कोणताही ठोस उपाय दिसत नाही. असेल तर जाहीर करावे.
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे. जो समाज आपला इतिहास विसरतो .तो आपली प्रगती करू शकत नाही .जरूर आपण आपला इतिहास शोधला पाहिजे .आणि आपल्या समस्या कोणत्या आहे. याचेही विसर होता कामा नये? आपण सिंधुस्तानी असो की राजा हिंदूस्तानी. आपली आजची परीस्थीती भयानक वाईट असुन चिंतन आणि मनन करणारी आहे.काही तर मंडळी आपण कसे बुद्धीवादी आहोत. हे पटवुन देण्यात तरबेज आहेत. तर काही मंडळी आपले नाते प्रिय येशुशी,शिख धर्माशी व अनेक पंथाशी जोडतात. तर काही मंडळी अनेक पंथ अनेक धर्माशी जोडण्याचा प्रयत्न करतात .त्यांमुळे तांडयात राहणारी मंडळी आज भामावुन,चक्रावुन गेली आहे.
शाळकरी कमी आणि माळकरी जास्त झाल्यामुळे आज माशी याडीची कलापथक करणारा गोरबंजारा समाज रामकथेमध्ये आंखड बुडाला आहे. आपली सगळी देव आपल्या लोखंडी संदुकी मध्ये एका कपडयात गुंडाळुन ठेवणारा हा समाज. फक्त कुलदैवत आणि याडीबापाला दिवाळी आणि होळीला धपुकार देतो.. घरात दु:खदायक घटना घडली .तर तो त्या वर्षी आपले कुलदैवत पुजेसाठी बाहेर काढत नाही. दैनंदिन पुजेला गोरसमाजात थारा नाही.तरीही आज गणपती काय महालक्ष्मी ,दुर्गादेवी काय बसवुन बारा तेरा दिवस पुजा मध्ये गुंग असतो.
वास्तुशांती, नवग्रह पुजा,काळर्शप पुजा करून तो आपली कमाई उडवत फिरतो. ऐवढेच नाही. तर आपल्या मुलांबाळाची लग्न पंचाग पाहील्या शिवाय करत नाही. हुंडा विषयी न बोललेलेचं बरे कारण हुंडा घेण्यात आज गोरबंजारा समाज सगळ्या समाजात आघाडीवर आहे. हुंडयापायी हा समाज कर्जबाजारी झाला. असुन अनेक लहान शेतकरी भुमीहीन झाले आहे. काही लोकांनी आपली घरे विकुन भाडयाच्या घरात राहात आहे. जेवढा जास्त शिकला तेवढा हुंडा जास्त अहो M.B.B.S.(M.D) मुलगी असेल तरीही हे महाभाग (अग्यानी) हुंडा घेणारचं! आपला सोन्यासारखा मुलगा हुंडयापायी हे बैलाच्या भावात विकणार .हुंडा घेणाऱ्या लोकांना कोणत्याही संघटनेत काम करण्याचा अधिकार बिलकुल नाही. अशा हुंडा घेणाऱ्या आणि आपल्या तांडयातील कुंटुंबाकडे दुर्लक्ष करणाऱ्या लोकांना संघटनेतुन तात्काळ हाकाल पटटी केली पाहिजे. हुंडा हा गोरबंजारा समाजाला लागलेला कँनसर आहे.
तरीही या भयंकर रुढीवर कोणी ही बोलतांना दिसत नाही. आणि गोरधर्म, गोरबोली, केसुलानयी मोरांया, मिंटीगपे मिंटीग, एकबंजारा लाख बंजारा,न खाता न बही हम करे वो सही, विविध विषयावरील वेबीनार,झुम मिंटीग घरातुनचं सुरु आहे. ऐवढेच नाही तर शिकली सावरलेली माणसे व्हाँटसपवर हा मँसेज १० लोकांना पाठवा संध्याकाळ पंर्यत चांगली बातमी येईल .असा मुर्खपणा करतात .त्यांची शाळेची टी.सी.तपासली पाहिजे .काही तर रोजचं व्हाँटसपवर ऐकमेकांना गाळीगलोच करतात .हे कुठेतरी थांबले पाहिजे. *रोग गुढघ्याला आणि पटी मात्र डोक्याला* अशा एंकदरीत भयानक प्रकार सुरू आहे. ही अंत्यत वेदनादायी असुन प्रंचड विचार करण्यास भाग पाडणारी गोष्ट आहे. जर आपण अशाच पद्धतीने वाटचाल करत राहीलो. तर मात्र गोरबंजारा समाजाला काहीही हाती लागणार नाही.आणि येणारी नवीन पिढी आपणास माफ करणार नाही. आपल्या पेक्षा मला नवीन पिढी मध्ये गोरबंजारा समाजाचे भविष्य दडलेले दिसंते.पण आपण त्यांना योग्य रस्ता दाखविण्या ऐवजी काल्पनीक स्वप्न दाखवुन त्यांच्या शक्तीचा नायनाट तर करत नाहींना ? अशी साभार भिती वाटतं आहे. देमागुरुचे फार अनमोल वचन आहे.
शिकचं शिकावचं शिके हात घडावच
आज जर आपण तांडयात गेलो. तर तरुण वर्ग शिक्षणाकडे पाठ फिरवुन तो विविध संघटनेत काम करतांना दिसतो आहे. विठ्ठला कोणता झेंडा घेवु हाती अशी बिकट परीस्थीती झाली आहे. ज्या गोष्टीचा गोरगणात सुतराम संबध नाही. अशा फाजील गोष्टी आपण तांडयाला सांगतो आहे. येथे मला तांडाकार विद्रीही साहित्यिक आत्माराम राठोड मामाचे विचार आठवतातं. माझ्या तांडयाने जर क्रांतीसुर्य सेवालालबापु , महात्मा फुले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महानायक वसंतराव नाईकसाहेबांचे विचार आत्मसात केले. तर माझा तांडा फुलायला वेळ लागणार नाही!.
हे नक्कीच मला सत्य वाटतें. तांडयातील मंडळी फार पोट तिडकिने बोलत होती.आणि सांगत होती. साहेब आमच्या तांडयाच्या भंयकर गरजा आहेत. त्यावर कोणी बोलायला तयार नाहीत. आम्हालाचं सांगतात गोर बंजारा समाज आता जागा झाला पाहिजे. आम्ही सांगतो.महानायक वसंतराव नाईकसाहेबांनी तमाम गोरगणाला जांगवंल आहे.आता जागवण्याची तुमच्या सारख्या कोण्या ऐऱ्यागैरा नथु खैऱ्याची गरज अजीबात नाही. ?...साहेब आपण शहरात गेलेली मंडळीचं गाढ झोपेत असुन आपली गौरवशाली परंपरा सोडुन विविध पंथ, धर्म आणि शाखे मध्ये तमाम गोरगणाला नेण्याचा जो केवीलवाणा प्रयत्न सुरु आहे.हेच आपल्या प्रगती मधील खरी अडचण आहे.
आतच वात बिजा गलरीछं?
ही चर्चा चालु असंताना एक वयस्कर माणुस हुसळुन आपले हात उंचाउन मला मनाला ..साहेब तांडा तुमच्या सारख्या अधिकारी लोकांनी बिघडवला. आम्ही होळीला पायी जोडुन बेभान नाचंत होतो.तर तुम्ही बिअरचे बक्षे आणुन गाण्यावर डाँस करता.आम्ही माणुस मेल्यावर तिसरा दिवस (दाडो) करत होतो. तर तुम्ही पाचवी,तेरवी आणली,दोन तिन डफडयावर लग्न करणारा तांडा साहेब ऐपत नसतांनाही तो डिजेच्या तालावर बिअर,देशी,इंगलीश पिऊन थिरकतो आहे, या व अशा अनेक गोष्टी तुम्ही तांडयामध्ये आणुन तांडा विद्रुप करण्याचे काम केले आहे.
एका एका तांडयात पंचवीस तिस अधिकारी असतांना शुद्धा तुम्हाला तांडयात साधे वाचनालय, व्यायाम शाळा काढता आले नाही.फक्त बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात. याला जबाबदार ...साहेब ......तुमची अधिकारी मंडळी आहे. आम्हाला माहीत आहे महानायक वसंतराव नाईकसाहेब, जलनायक सुधाकरभाऊ नाईक साहेब सारखा नेता. आणि श्रद्धेय महान तपस्वी संत डॉ. रामरावबापु महाराज सारखा संत आता समाजात एक हजार वर्षातही होणार नाही.
आज हयाती मध्ये कोणतीही संघटना, पक्ष,नेता,संत,महंत, मंत्री, आमदार गोरबंजारा समाजाचा सर्वागींण विकास करणार नाही. ही काळया दगडावरची रेघ आहे.आता गोरबंजारा समाजात अविरहीत कष्ट करण्याची तयारी, अफाट लोकसंग्रह,सामान्य माणसा बद्धल करुणा, उदंड आत्मविश्वास, कर्तव्य कठोरता,लोकांना सोबत घेऊन चालण्यासाठी लागणारा सतगुण ,दष्टेपणा, समाजाची उनती करण्याची तिव ईच्छा, हे सर्व गुण संपन्न माणुस आज तरी गोर बंजारा समाजात दिसत नाही. गोरगणात एक म्हण आहे बार नायक किम किम भसरे जेर खबर न वाडी अशी गत समाजाची झालेली आहे.ऐवढे सांगुन दुसऱ्या नायकाने सांगितले.
नावी केरो नावशा धोबी केरो धोबशा कावा खोरीरा किम जावचोरे तम! तांडा आजही आपली गौरवशाली परंपरा जपुन आहे. कोठेही जाण्याची गरज नाही. तांडयातील लोकांचे तांडयाकडे पाहण्याचा किती सुक्षम दुष्टीकोन असतो. हे मला वरील चर्चेत दिसून आले. एवढी गंभीर चर्चा झाल्यानंतर मलाही मनोमन वाटायंला लांगलं.
घोडे को नहीं घास और गधे खा रहे है च्यवनप्राश!
जाता जाता एका माणसाने सांगितले साहेब माझा मुलगा पोलीस असुन तो एका संघटनेच्या पायी दिवस रात्र व्हाँटसपवर काही बाही लिहत राहतो..नौकरी जाण्याची पाळी आली आहे.. साहेब शक्य असेल तर समजावां त्यालां ? मी गंभीर विचार करत घरी आलो.लेख लिहला. या पलीकडे माझ्या हातात आहे. तरी काय......सलाम त्या प्रज्ञावान नायकांना चुकीला माफी असावी.कारण ही चर्चा तांडयातील प्रत्यक्ष भेटी मधील आहे.
आज गोरबंजारा समाजाच्या धाटी ,ऐतिहासिक परंपरा, गौरवशाली संस्कृतीवर घाला घालण्यासाठी अनेक लोकांनी पुढाकार घेतलेला आहे. गोर बंजारा समाजाची प्रेरणास्थाने सुद्धा राजकीय अड्डा बनवण्याच्या तयारीत काही गैर बंजारा लोक आहे. या लोकांना वेळीच रोखण्यासाठी गोर बंजारा समाजातील महाराज साहित्यिक, लेखक, कवी, विद्वान, प्राध्यापक, डॉक्टर, इंजिनीयर, विचारवंत, संशोधक आणि तरुण पिढीने पुढाकार घ्यावा नाहीतर ही मंडळी गोर बंजारा समाजाच्या धाटी परंपरेची चौकटी तोडल्याशिवाय राहणार नाही ही काळया दगडावरची रेघ आहे म्हणून म्हणावेसे वाटते की.... घोडे को नही घास और गधे खा रहे चवनप्राश!
जय सेवा...जय वसंत.!
एक गोर.....नेक गोर.!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
✍️ याडीकार पंजाब चव्हाण पुसद -९४२१७७४३७२