गोरमाटी भाषा गौरव दिवस पंधरवडा २०२६: संस्कृती आणि विचारांचा महोत्सव

गोरमाटी भाषा गौरव दिवस पंधरवड्याचा सविस्तर आढावा. २ एप्रिल ते १७ एप्रिल २०२६ दरम्यान आयोजित या महोत्सवात साहित्य, लोककला, सामाजिक न्याय आणि बंजारा संस्कृतीवर झालेले विचारमंथन.

गोरमाटी भाषा गौरव दिवस पंधरवडा २०२६: संस्कृती आणि विचारांचा महोत्सव

गोरमाटी भाषा गौरव दिवस पंधरवडा :  संस्कृती, विचार आणि आत्मभानाचा रंगतदार महोत्सव

 गोरमाटी भाषा गौरव दिन हा महोत्सव
 मोहन गुणाजी नायक यांचा जन्मदिन साजरा करण्यासाठी केला जातो.

           ०२ एप्रिल २०२६ ची सुरवात विचारांच्या दीप प्रज्वलनाने  झाली. ज्ञानाने,विचाराने सजलेल्या पंधरवड्याची सुरुवात अत्यंत विचारप्रवर्तक वातावरणात झाली.गोरमाटी साहित्य चळवळीचा काल,आज आणि उद्याचा आढावा घेताना डॉ. प्राचार्य पी.एल.चव्हाण यांनी आपल्या अभ्यास पूर्ण भाषाणातून साहित्याच्या प्रवाहातील परिवर्तन अधोरेखित केले. पहिल्या दिवशी डॉ.प्राचार्य चव्हाण (नांदेड) यांनी “गोरमाटी साहित्याचा काल, आज आणि उद्याचा प्रवास” आपल्या सुंदर गोर भाषेत उलगडून सांगितला. त्यांनी गोरमाटी साहित्य चळवळीचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य यांचा वेध घेताना शब्दांना विचारांची धार दिली.तर गोरमाटी समाजातील प्रसिद्ध गायक,भजनकार, प्रबोधनकार रामराव महाराज भाटेगावकर यांनी गोरमाटी भाषेला संविधानिक मान्यता मिळवण्याच्या शक्यता आणि त्यावरील मार्ग यावर सखोल मार्गदर्शन केले.हजरजबाबी प्रबोधनकार रामराव महाराज भाटेगावकर यांनी गोरमाटी भाषेची सांस्कृतिक ओळख स्पष्ट करत समाजात अभिमानाची भावना निर्माण केली.प्रबोधनकार रामराव महाराज भाटेगावकर यांनी संविधानिक ओळखीच्या प्रश्नावर बोलताना उपस्थितांच्या मनात आशेची नवीन पालवी फुलवली.

       या पहिल्याच दिवशी भाषिक अस्मितेची ठिणगी प्रज्वलित झाली. काकाचा जन्मदिन गोरमाटी भाष्या गौरव दिन हा जिवंत विचारांचा प्रेरणादायी प्रवास ठरणार आहे.“गोरमाटी भाषा गौरव दिन” हा गोरमाटी समाजाच्या अस्मितेचा, संस्कृतीचा आणि प्रबोधनाचा एक अद्वितीय सोहळा ठरला. हा दिवस म्हणजे गोर बंजाराचा आत्मभान जागवणारा पहिला सूर होता.विविध मान्यवर वक्त्यांनी आपल्या विचारांनी या १५ - १६ दिवसांच्या प्रवासाला समृद्ध केलेले आहे .पंधरवड्याची सुरुवात जणू विचारांची ज्ञानदीप प्रज्वलित करूनच झाली.

       ०३ एप्रिल हा दिवस लोकसाहित्याचा झंकारता उत्सव म्हणता येईल. दुसऱ्या दिवशी लोक साहित्याच्या सुरेल लयींनी वातावरण भारून गेले. आदुसंघ नायक, महिला मंडळ सिंगोडा, मोरसिंग देवसोत(खाणदेस) आणि नसाबी किसन राठोड(जिवती) यांच्या सादरीकरणांनी परंपरेचा ठेवा जणू डोळ्यांसमोर उभा राहिला. गाण्यांचे सूरांची ओढ आणि कलांची झलक हे सगळंच मनात घर करून गेले. हा लोकसाहित्याचा रंगोत्सव ठरला .दुसऱ्या दिवशी लोकसाहित्याच्या विविध छटा अनुभवायला मिळाल्या.आदुसंघ नायक,महिला मंडळ (सिंगोडा), मोरसिंग देवसोत आणि नसाबी किसन राठोड यांनी आपल्या सादरीकरणातून गोरमाटी संस्कृतीचे जिवंत दर्शन घडवले. लोकपरंपरेतील गाणी, आणि कला यांचा मोहक संगम प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून गेला. लोकसाहित्याच्या रंगात न्हालेल्या या दिवशी    लोकपरंपरा, कला आणि संस्कृती यांचे महत्त्व अधोरेखित केले.

         ०४ एप्रिल हा दिवस म्हणजे साहित्याच्या गाभाऱ्यातील चिंतनाचा दिवस. भीमणीपुत्र मोहन नायक यांच्या समग्र साहित्यावर चिंतन करताना कल्लोळकार डॉ.वसंत राठोड,गणेश करमठोट(दमाळ प्रकाशन) आणि संकेत चव्हाण यांनी साहित्याच्या सामाजिक प्रभावावर प्रकाश टाकला. या चर्चेतून साहित्य हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन असल्याचे स्पष्ट झाले.डॉ. वसंत राठोड ( कल्लोळकार)  समाजनायक मोहन नायक यांच्या साहित्य या विषयावर चिंतन करत प्रेरणादायी विचार मांडले.भीमणीपुत्र मोहन नायक यांच्या साहित्यावर चिंतन करताना विचारांची एक वेगळीच मैफल रंगली.डॉ.वसंत राठोड आणि अन्य मान्यवरांनी साहित्याच्या शब्दांना सामाजिक परिवर्तनाची ताकद दिली. हा दिवस जणू विचारांच्या गाभाऱ्यात डोकावण्याचा अनुभव ठरला.

         ०५ एप्रिल हा दिवस सामाजिक न्यायाचा ठाम स्वर ठरला. या दिवशी आरक्षणाच्या प्रश्नावर झालेल्या चर्चांनी वास्तवाचा आरसा दाखवला. संतोष जाधव आणि रामराव महाराज भाटेगावकर यांच्या भाषणांनी समाजाच्या हक्कांसाठी लढण्याची प्रेरणा दिली. हा दिवस जणू संघर्षाची जाणीव करून देणारा होता.सामाजिक न्यायाची जाणीव करून देणारा हा दिवस.या दिवशी बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर संतोष जाधव यांनी वस्तुनिष्ठ विश्लेषण मांडले.तसेच रामराव महाराज भाटेगावकर यांनी विमुक्त आणि भटक्या जमातींच्या आरक्षणाचा इतिहास आणि वर्तमान परिस्थिती स्पष्ट केली.या चर्चांमुळे सामाजिक न्यायाची जाणीव अधिक दृढ झाली.

      ०६ एप्रिलला समाजात होत असलेल्या बदलाची चाहूल समाजाला कळाली असेल. अंबरसिंग चव्हाण (मुंबई) आणि उर्मिला पवार (पुणे) यांनी जातपंचायत व समाजातील बदल या विषयावर सखोल चर्चा केली.सामाजिक प्रश्नांवर उपाययोजना,जातवार जनगणनेच्या गरजेवर अंबरसिंग चव्हाण आणि उर्मिला पवार यांनी प्रभावी विचार मांडले. समाजाच्या अचूक विकासासाठी माहितीची आवश्यकता किती महत्त्वाची आहे, हे अधोरेखित झाले.जातवार जनगणनेवर झालेल्या चर्चेतून समाजाच्या अचूक प्रगतीसाठी माहिती किती आवश्यक आहे, हे स्पष्ट झाले. अंबरसिंग चव्हाण आणि उर्मिला पवार यांच्या विचारांनी बदलाची चाहूल लागली.

        ०७ एप्रिल २०२६ हा दिवस समाज मत परिवर्तनाचा निर्धार करण्याचा दिवस होता .
हुंडा पद्धतीसारख्या अतिशय वाईट सामाजिक रूढींवर कठोर भाष्य करत तरुण तडफदार डॉ. व्यंकटेश राठोड (मुंबई) यांनी समाज जागृती केली.भाऊराव चव्हाण(सहाय्यक आयुक्त समाज कल्याण) यांनी सामूहिक विवाहाचा संदेश देत समाजाला नवी दिशा दिली.हा दिवस परिवर्तनाचा ठाम निर्धार घेणारा ठरला.यातून सामाजिक परिवर्तनाचा अंधूकसा मार्ग दिसला.हुंडा पद्धतीसारख्या सामाजिक समस्यांवर डॉ. व्यंकटेश राठोड आणि भाऊराव चव्हाण यांनी सामूहिक विवाहाची गरज पटवून दिली.या दिवशी समाज सुधारणेचा स्पष्ट संदेश देण्यात आला. भाऊसाहेब चव्हाण यांनी हुंडा पद्धती व गोरमाटी समाजातील समस्या यावर प्रभावी विचार मांडले. तसेच सामुदायिक बाबींवर उपाययोजना मांडण्यात आल्या.सदर विषयावर नागपूर येथील बुध्दीजीवी अशोक पवार आणि श्रीपत राठोड यांनी मार्मिक भाष्य केले.

        ०८ एप्रिल हा दिवस काव्याच्या सुरांनी भारलेले क्षण घेवून आला. बंजारा जीवन गण्यांनी भरलेला आहे.बंजाराचा प्रत्येक क्षण गाण्यानी व्यापलेला आहे.कवी संमेलनाच्या माध्यमातून समाजातील स्त्री पुरुष भावना,वेदना आणि आशा यांना काव्यरूप देण्यात आले.कवी संमेलनाने वातावरणाला एक वेगळीच रंगत दिली.प्रत्येक कवितेत भावना,वेदना आणि आशेचे रंग मिसळले होते.हा दिवस जणू शब्दांच्या सुरांनी सजलेला होता.काव्य रसाचा उत्सव विश्व रोमा बंजारा दिवसानिमित्त आयोजित कवी संमेलनाने वातावरण भावमय केले.कवींनी आपल्या कवितांमधून समाजाच्या भावना,वेदना आणि आशा यांची सुंदर अभिव्यक्ती केली.

      ०९ एप्रिल विवेकाचा प्रकाश पाडणारा दिवस, अंधश्रद्धेच्या अंधारातून बाहेर पडण्याचा संदेश देत प्राचार्य ग.ह.राठोड यांनी विवेकाचा दीप लावला.अशोक राणाजी राठोड यांनी विचार शक्तीला जीवन कौशल्याचा दर्जा देत मनाला नवी दिशा दिली.प्राचार्य  राठोड यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचारांचा वारसा उलगडला.तर अशोक राणाजी राठोड यांनी “थिंकिंग स्कील ईज लाईफ स्किल” या विषयावर मार्गदर्शन केले.विवेक आणि विचारशक्तीचा संदेश यांनी दिला.प्राचार्य राठोड यांनी अंधश्रद्धेपासून दूर राहण्याचे महत्त्व सांगितले.अशोक राणाजी राठोड यांनी थिंकिंग स्किल इज लाईफ स्किल’ या विषयावर विचारमंथन करत विवेकशिलतेचे महत्त्व अधोरेखित केले.

       १० एप्रिल रोजी संस्कृतीचे रक्षण आपली जबाबदारी आहे. या विषयी हरपणी जीजाताई राठोड आणि इंजि.राधेश्याम आडे यांनी विचार मांडले.बंजारा संस्कृतीवरील सांस्कृतिक आक्रमणाला कसे रोखता येईल,यावर मार्गदर्शन केले.सांस्कृतिक जतणाची गरज अधोरेखित झाली.जीजाताई राठोड आणि राधेश्याम आडे यांनी सांस्कृतिक आक्रमणाच्या विरोधात सजग राहण्याचे आवाहन केले.हा दिवस जणू आपल्या ओळखीचे रक्षण करण्याचा ध्यास देणारा होता.
हरपणी जीजाबाई राठोड (जळगाव) आणि इंजि. राधेश्याम आडे (मुंबई) यांनी सांस्कृतिक आक्रमण व त्यावरील उपाय यावर भाष्य केले.

        ११ एप्रिल या दिवशी शिक्षण हा समाजाचा कणा आहे. आज सरकारी शाळांच्या संवर्धनावर झालेल्या चर्चांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.हा दिवस समाजाच्या भवितव्याचा विचार करणारा ठरला.डॉ.प्रा.मांगीलाल राठोड (संभाजी नगर) आणि रविंद्र जाधव (सहशिक्षक) यांनी सरकारी शाळांचे भविष्य आणि महत्त्व यावर विचार मांडले.शिक्षणाचे महत्त्व डॉ.मांगीलाल राठोड आणि रविंद्र जाधव(पालघर) यांनी सरकारी शाळांचे महत्त्व पटवून देत शिक्षणव्यवस्थेच्या संवर्धनाची गरज स्पष्ट केली.

      १२ एप्रिलला परंपरेचा खजिना उलगडताना बंजारा कथा, कोडी आणि उखाण्यांनी परंपरेचा वारसाच समाजासमोर मांडला गेला.बंजारा कथा, कोडी आणि उखाण्यांच्या माध्यमातून मोतीराम रूपसिंग राठोड (नांदेड ), आदुसंघ नायक आणि तरुण प्रा.नेमीचंद चव्हाण यांनी पारंपरिक ज्ञानाचा ठेवा उलगडला. बालपणीच्या आठवणी जागवल्या. मोतीराम रुपसिंग राठोड आणि इतर मान्यवरांनी परंपरेचा खजिना उघडला.या दिवशी मोतीराम राठोड यांनी आपल्या अनुभवांमधून समाजातील जीवनपट जिवंत केला.तर प्रा . नेमीचंद यांनी ओळखण्याच्या लज्जतदार कोडी सांगून सगळ्या श्रोत्यांना चक्क त्यांच्या बालपणात घेवून गेले. 

      १३ एप्रिल हा दिवस गितांतून संस्कृतीची ओळख करून देणारा ठरला. शिवाजी जाधव जिवती (जेष्ठ कवी) आणि नामदेव पवार(धाटी अभ्यासक) यांच्या गीतांनी संस्कृतीचे रंग खुलविले.हा दिवस जणू परंपरेच्या सुरांनी भारलेला होता.शिवाजी जाधव आणि नामदेव पवार यांनी वाचन संस्कृती व विचार परंपरा यांचे महत्त्व पटवून दिले.गीत आणि संस्कृतीचा संगम बंजारा गीत,रितीरिवाज आणि लग्न परंपरांचा सुंदर परिचय करून दिला.संस्कृतीची मुळे अधिक घट्ट झाली असे मला वाटते

       १४ एप्रिल हा दिवस इतिहासाच्या पाऊलखुणा घेवून श्रोत्या समोर प्रगट झाला. Telangana People's Armed Struggle या विषयावर झालेल्या चर्चेतून संघर्षाचा इतिहास जिवंत झाला.हा दिवस प्रेरणादायी ठरला.डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांचे स्मरण करून समाजात नवचैतन्य निर्माण करण्यात आले.या विषयावर एम.धर्मानायक(हैदराबाद) आणि जयसिंग राठोड(वरंगल) यांनी ऐतिहासिक संघर्षाचा आढावा घेतला.संघर्षातून उभ्या राहिलेल्या शक्तीची जाणीव झाली.

       १५ एप्रिलला संघटन आणि नेतृत्वाची दिशा डॉ.अभय जाधव(अंबड) आणि डॉ.अशोक बंजारा(दिल्ली) यांनी संघटन आणि नेतृत्वाचे महत्त्व अधोरेखित केले.या दोघांही तरुणांनी हा दिवस म्हणजे बंजारांना भविष्याची दिशा दाखवणारा ठरला.डॉ. अभय जाधव यांनी राष्ट्रीय संघटनांची निर्मिती यावर विचार मांडले.डॉ. अशोक बनजारा या तरुण वक्त्यानी श्रोत्यांना त्यांच्या विचारांनी मंत्रमुग्ध केले.केवळ तत्वज्ञान न मांडता अतिशय प्रगल्भ व्यावाहारीक विचार त्यांनी मांडले.त्यांनी सामाजिक,सांस्कृतिक आणि राजकीय संघटनांचे दर्शन घडवले.डॉ.अभय जाधव आणि डॉ.अशोक बंजारा या दोन्ही तरुण वक्त्यांनी राजकीय,सामाजिक आणि सांस्कृतिक संघटनांच्या गरजेवर सखोल विचार मांडले.यामुळे नेतृत्वाची दिशा स्पष्ट झाली.

        १६ एप्रिल हा आत्मजागृतीचा गजर करणारा दिवस ठरला. मच्छिंद्र चव्हाण(सेवानिवृत्त सह.पोलिस आयुक्त, पुणे) यांनी संघटनाची गरज सांगितली,तर डॉ. शाम मुडे (सत्यशोधक) यांनी मानसिक गुलामगिरीवर प्रखर भाष्य केले.हा दिवस सर्वांनाच अंतर्मुख करणारा ठरला.या दिवशी मच्छिंद्र चव्हाण  यांनी शासकीय सहकार्याचे महत्त्व सांगितले.मच्छिंद्र चव्हाण यांनी राष्ट्रव्यापी संघटनाची गरज स्पष्ट केली, तर डॉ. शाम मुडे यांनी मानसिक गुलामगिरीवर प्रभावी भाष्य केले. यामुळे समाजाला निश्चितच आत्मजागृतीचा संदेश मिळाला आहे .

        १७ एप्रिल हा दिवस प्रेरणेचा समारोप ठरला. आज पद्मश्री रामसिंग भानावत यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेण्याचा संदेश देण्यात आला.हा समारोप जणू नवचैतन्याचा प्रारंभच ठरला.हा संपूर्ण कार्यक्रम गोरमाटी समाजासाठी एक दीपस्तंभ ठरला.
आभासी सभेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. पंडित चव्हाण होते .(अध्यक्ष- पोरीयातारा बंजारा टिचर्स ॲन्ड प्रोफेसर असोसिएशन )तर मा.बि.के.नाईक साहेब(सेवानिवृत्त जिल्हाधिकारी),प्राचार्य डॉ प्रकाश राठोड (परिवर्तनवादी ज्येष्ठ साहित्यिक तथा अध्यक्ष- अ. भा. तांडा सुधार समिती) यांनी रामसिंग भानवत यांचे विचार मांडले.राजीव रत्ने(नागपूर) यांनी प्रस्तावनेतून भानावत या थोर पुरुषांची ओळख करून दिली.पद्मश्री रामसिंग भानावत यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून प्रेरणा घेण्याचा संदेश देण्यात आला.प्राचार्य डॉ.पंडित चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली हा पंधरवडा प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

        या पंधरवाड्यातून आपण काय मिळवलो ? काय साध्य झालं ?

        ०२ एप्रिल २०२६ ते १७ एप्रिल २०२६ या कालावधीत पार पडलेल्या या पंधरवड्यात प्रत्येक दिवस नवनव्या विचारांनी,चिंतनांनी आणि सांस्कृतिक उर्जेने उजळून निघाला.या पंधरवाड्याची सुरुवात गोरमाटी साहित्य चळवळीच्या भूतकाळ,वर्तमान आणि भविष्याचा वेध घेणाऱ्या अभ्यासपूर्ण विचार मंथनाने झाली.भाषेला संविधानिक मान्यता मिळवून देण्याच्या शक्यता आणि मार्ग यावरही प्रभावी चर्चा झाली.या चर्चां मुळे भाषिक अस्मिता अधिक दृढ झाली.

        प्रत्येक दिवशी मांडलेले विचार,अनुभव आणि मार्गदर्शन यांनी समाजाला नवी दिशा दिली.एकता,शिक्षण आणि संस्कृती यांच्या बळावर समाज प्रगती करू शकतो,हा संदेश या कार्यक्रमातून ठळकपणे समोर आला.हा पंधरवडा म्हणजे गोर माटी भाषेचा गौरव,संस्कृतीचा उत्सव आणि सामाजिक जागृतीचा दीपस्तंभ ठरला. प्रत्येक दिवसाने नवी ऊर्जा दिली,विचारांना चालना दिली आणि समाजाला प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्याची प्रेरणा दिली.असा हा ज्ञान समृद्ध आणि संस्कारमय प्रवास सर्वांच्या मनात कायमस्वरूपी कोरला गेलेला आहे.हा एक सांस्कृतिक चेतनेचा सुवर्ण सोहळा ठरला.या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या अभासी सभा म्हणजे केवळ कार्यक्रमांची मालिका नव्हे,तर बंजारा (गोर माटी) समाजाच्या भाषा,संस्कृती,परंपरा आणि विचारप्रवाह यांचा एक भव्य उत्सव ठरला.लोक साहित्याच्या दिवसाने पारंपरिक कला,गीते आणि लोक जीवनाचे रंग खूलवले.विविध कलाकारांनी आपल्या सादरीकरणातून गोर माटी संस्कृतीचे जिवंत दर्शन घडवले.तिसऱ्या दिवशी भीमणीपुत्र मोहन नायक यांच्या साहित्यावर चिंतन करताना साहित्याच्या माध्यमातून समाज जागृतीची शक्ती अधोरेखित झाली.पुढील दिवसांत सामाजिक आणि राजकीय विषयांवर सखोल चर्चा झाली. आरक्षण,जातवार जनगणना,विमुक्त आणि भटक्या जमातींचे प्रश्न यावर विचारमंथन करताना समाजाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या धोरणांची जाणीव निर्माण झाली.हुंडा प्रथा , सामूहिक विवाह यांसारख्या सामाजिक विषयांवर चर्चा होऊन परिवर्तनाची दिशा स्पष्ट झाली.

         कवी संमेलनाच्या माध्यमातून भाव विश्वाची अभिव्यक्ती झाली,तर अंधश्रद्धा निर्मूलन,विचार शक्तीचा विकास,सांस्कृतिक आक्रमणाला विरोध, आणि शिक्षण व्यवस्थेचे महत्त्व यांसारख्या विषयांनी समाजमनाला नवी दिशा दिली.बंजारा कथा,कोडी,गीते आणि पारंपरिक रितीरिवाज यांमुळे सांस्कृतिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे कार्य झाले.राजकीय संघटन, सामाजिक बांधिलकी आणि मानसिक स्वातंत्र्य यांसारख्या गंभीर विषयांवर झालेल्या चर्चांनी आत्मभान जागवले. विशेषतः “मानसिक गुलामगिरी ही शारीरिक गुलामगिरीपेक्षा अधिक धोकादायक असते” हा संदेश अंतर्मुख करणारा ठरला.

         या पंधरवड्याचा समारोप पद्मश्री रामसिंग भानावत यांच्या व्यक्तिमत्त्व आणि त्यांच्या समाजकार्यातील योगदानाच्या स्मरणाने झाला. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत समाज उन्नतीच्या दिशेने वाटचाल करण्याची प्रेरणा सर्वांना मिळाली.एकूणच,हा पंधरवडा म्हणजे ज्ञान, संस्कृती,परंपरा आणि परिवर्तन यांचा सुंदर संगम होता.प्रत्येक दिवसाने समाजमनात नवचैतन्य निर्माण केले आणि गोरमाटी भाषेच्या गौरवाला नवे आयाम दिले.असा हा विचारसमृद्ध आणि प्रेरणादायी सोहळा दीर्घकाळ स्मरणात राहील, यात शंका नाही.हा एक अविस्मरणीय सांस्कृतिक पर्व आहे .

     हा पंधरवडा म्हणजे केवळ कार्यक्रम नव्हता, तर तो एक जिवंत अनुभव होता विचारांचा, संस्कृतीचा आणि आत्मभानाचा.प्रत्येक दिवसाने मन समृद्ध केले,विचारांना चालना दिली आणि समाजाला नव्या उंचीवर नेण्याची प्रेरणा दिली. असा हा रंगतदार, लज्जतदार आणि प्रेरणादायी महोत्सव दीर्घकाळ स्मरणात राहील!गोरमाटी भाषा गौरव दिवस पंधरवडा हा विचार,संस्कृती आणि जागृतीचा प्रेरणादायी प्रवास हा संपूर्ण कार्यक्रम गोरमाटी समाजासाठी एक दीपस्तंभ ठरला. प्रत्येक दिवशी मांडलेले विचार, अनुभव आणि मार्गदर्शन यांनी समाजाला नवी दिशा दिली. एकता, शिक्षण आणि संस्कृती यांच्या बळावर समाज प्रगती करू शकतो, हा संदेश या कार्यक्रमातून ठळकपणे समोर आला.
   गोरमाटी भाषा गौरव दिन आयोजन समिती यांनी समाजहितासाठी जे पाऊल उचललेली आहे तिचं सर्वत्र कौतुक होत आहे.गोरमाटी भाषा गौरव दिन समितीचे मनापासून अभिनंदन करतो आणि पुढिल वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतो.

राठोड मोतीराम रूपसिंग
पूर्व गट शिक्षण अधिकारी नांदेड .
तथा माजी अशासकीय सदस्य महाराष्ट्र राज्य गोरबंजारा साहित्य परिषद .