गोर बंजारा जमात आणि एस.टी. आरक्षण : “सोशल ट्रायल” मधून उभे राहणारे कठोर प्रश्न

गोर बंजारा समाजाच्या एस.टी. आरक्षणाच्या लढ्याचा सखोल आढावा. सामाजिक, ऐतिहासिक आणि वर्तमान परिस्थितीवर आधारित “सोशल ट्रायल” विश्लेषण.

गोर बंजारा जमात आणि एस.टी. आरक्षण : “सोशल ट्रायल” मधून उभे राहणारे कठोर प्रश्न

✍️ गोर बंजारा जमात – एस.टी. आरक्षणासाठी एक “सोशल ट्रायल”

गेल्या तब्बल ७८ वर्षांपासून गोर बंजारा जमातीचा एस.टी. (अनुसूचित जमाती) प्रवर्गामध्ये समावेश व्हावा, हा प्रश्न अजूनही अधांतरीच आहे. इतिहास, परंपरा, सांस्कृतिक वारसा आणि सामाजिक-आर्थिक मागासलेपण यांचे अनेक पुरावे असतानाही, संवैधानिक हक्क अद्याप मिळालेला नाही — ही वस्तुस्थिती अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहे.

आज हा विषय न्यायालयात मांडण्यापूर्वी, समाजाच्या अंतरात्म्याच्या दरबारात एक “सोशल ट्रायल” म्हणून मांडण्याची गरज आहे. कारण कोणत्याही मोठ्या लढ्याची सुरुवात ही आतून — आत्मपरीक्षणातून —च होते.

🔹 गोर बंजारा सोशल ट्रायल

नायकेरे दरबारेमा,
गोर बंजारा जमातेर, हासाबी, नसाबी, नायक, कारभारी, डायेसांळ अन् गोरकुळीन हारद करतांळी...

🔸 आरोप क्र. (१)

“गोर बंजारा संत-महंत स्वतःची आदिवासी ओळख शासन आणि न्यायालयासमोर ठोस पुराव्यांसह सिद्ध करू शकतात का?”

आजचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की —
ज्यांनी वैदिक परंपरा, पोशाख आणि धार्मिक जीवनशैली स्वीकारली आहे, ते स्वतःला आदिवासी मूलनिवासी म्हणून कसे सिद्ध करणार?

❓ विचार करण्यासारखे मुद्दे:

  • संत-महंतांची सद्याची वेशभूषा, देहभाव, बोली आणि परंपरा — या सर्व गोष्टी आदिवासी जीवनशैलीशी सुसंगत आहेत का?

  • वैदिक परंपरेत गुंतलेली ओळख, न्यायालयात आदिवासी अस्मितेचा पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाईल का?

  • बदललेली जीवनशैली आणि संस्कृती पाहता, मुळ ओळख जपली आहे की हरवली आहे?

🔍 वास्तवाचा आरसा

👉 धर्म हा वैयक्तिक श्रद्धेचा विषय आहे — यात शंका नाही.
पण एस.टी. आरक्षण हा संवैधानिक हक्क आहे, आणि तो मिळवण्यासाठी आवश्यक असतात:

  • ठोस ऐतिहासिक पुरावे

  • परंपरा आणि रुढींची सातत्यपूर्ण नोंद

  • सामाजिक व आर्थिक मागासलेपण

  • आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे — सद्यस्थितीतील जीवनशैली

👉 शासन, प्रशासन आणि न्यायालय धर्माकडे नाही, तर वास्तविक जीवनशैली आणि सामाजिक परिस्थितीकडे पाहतात.

⚖️ मुख्य प्रश्न

जर आज आपली ओळख पूर्णतः वैदिक आवरणाखाली गेली असेल,
तर उद्या न्यायालयात आपण आपला आदिवासीपणा कसा सिद्ध करणार?

हा प्रश्न केवळ संत-महंतांचा नाही,
तर संपूर्ण गोर बंजारा समाजाच्या भवितव्याशी जोडलेला आहे.

🧭 एस.टी. आरक्षणाच्या लढ्यासाठी आवश्यक तीन स्तंभ

1️⃣ संत-महंतांची भूमिका

धर्माधारित नव्हे, तर संवैधानिक न्यायासाठी सत्यनिष्ठ बांधिलकी आवश्यक.

2️⃣ राजकीय नेतृत्व

केवळ आश्वासन नव्हे — पुरावे, अभ्यास आणि ठोस कृती हवी.

3️⃣ समाजाची एकजूट

तुकड्यांत विभागलेला समाज नाही,
तर एकत्रित, जागरूक आणि ठाम समाजच हक्क मिळवू शकतो.

🔔 निष्कर्ष

गोर बंजारा समाजाच्या एस.टी. आरक्षणाचा प्रश्न हा केवळ राजकीय किंवा धार्मिक नाही —
तो ओळख, अस्तित्व आणि न्याय यांचा प्रश्न आहे.

आज गरज आहे ती एकमेकांवर आरोप करण्याची नाही,
तर स्वतःला विचारण्याची —
“आपण आपल्या मुळ ओळखीशी प्रामाणिक आहोत का?”

टिप: या लेखाचा उद्देश कुणाचाही अपमान करणे नसून, समाजासमोर असलेल्या वास्तव प्रश्नांबद्दल जागरूकता निर्माण करणे हा आहे.

✍️ अनिश नायक, वाशीम