८ एप्रिल चलो मुंबई! बंजारा समाज आरक्षण महामोर्चा | भीमराव जाधव
बंजारा समाजाच्या एसटी आरक्षण आणि हक्कासाठी ८ एप्रिल रोजी मुंबईत भव्य मोर्चा. समाजसेवक भीमराव जाधव आणि विनोद भाऊ आडे यांचे समाजबांधवांना आवाहन.
🚩 चलो मुंबई! ८ एप्रिल: आरक्षणाच्या लढाईसाठी एल्गार! 🚩
मुंबईत धडकणार बंजारा समाजाचा महामोर्चा; भीमराव जाधव यांचे समाजबांधवांना जाहीर आवाहन!
मुंबई: बंजारा समाजाच्या न्याय्य हक्कासाठी आणि अस्तित्वाच्या लढाईसाठी येत्या ८ एप्रिल रोजी मुंबईत भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. "आता नाही तर कधीच नाही" या निर्धाराने समाजबांधवांनी मोठ्या संख्येने मुंबईत दाखल व्हावे, असे आवाहन खंबीर समाजसेवक भिमराव जाधव यांनी केले आहे.
या मोर्चाच्या माध्यमातून समाजाच्या प्रलंबित मागण्या सरकारसमोर मांडल्या जाणार आहेत.
📌 मोर्चाच्या प्रमुख मागण्या:
-
एस.टी. (ST) आरक्षण अंमलबजावणी: समितीचा अहवाल सादर करून, धनगर समाजाप्रमाणेच बंजारा समाजाला आदिवासी सोयी-सवलती लागू करण्यात याव्यात.
-
बोगस घुसखोरीवर बंदी: सध्या व्हीजे/एनटी (VJ/NT) प्रवर्गामध्ये सुरू असलेली बोगस घुसखोरी थांबवून सरकारने यावर ठोस आणि कडक भूमिका घ्यावी. घुसखोरीमुळे मूळ समाजाच्या हक्कावर गदा येत आहे.
-
शहीद तरुणांच्या कुटुंबांना न्याय: आरक्षणाच्या लढाईत बलिदान दिलेल्या समाजाच्या तरुण शहीद वीरांच्या कुटुंबाला भरीव आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी त्वरित देण्यात यावी.
खेकडा वृत्तीच्या लोकांपासून सावध राहा!
समाजसेवक भिमराव जाधव यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे की, "काही लोक घरात बसून केवळ राजकारण करत आहेत आणि मोर्चाबद्दल गैरसमज पसरवत आहेत. अशा विघ्नसंतोषी लोकांपासून सावध राहा. समाजविघातक प्रवृत्तींना योग्य वेळी पुराव्यानिशी उत्तर दिले जाईल."
विनोद भाऊ आडे यांच्या संघर्षाला साथ द्या!
आज उपोषणकर्ते विनोद भाऊ आडे हे एस.टी. आरक्षणाचा मुद्दा जिवंत ठेवण्यासाठी जिवापाड परिश्रम घेत आहेत. मुंबईत मोर्चा काढून प्रसंगी उपोषणाची तयारी त्यांनी दर्शवली आहे. त्यांच्या या संघर्षाला बळ देण्यासाठी संपूर्ण समाजाने एकत्र येणे काळाची गरज आहे.
"जोपर्यंत आपण आपली वज्रमूठ दाखवत नाही, तोपर्यंत सरकार दखल घेणार नाही. ८ एप्रिल रोजी मुंबईत आपली ताकद दाखवून द्या!" — भिमराव जाधव (समाजसेवक)
चला, आपल्या हक्कासाठी... आपल्या भविष्यासाठी! जय सेवालाल! ✊🏳️